रात्र नाही तर स्वप्नं बदलते
लक्ष्य नाही तर मार्ग बदलतात....
नशीब नाही तर वेळ बदलते
माणूस नाही तर स्वभाव बदलतात ......
कळेल कधी हे प्रेम तुला?
शब्दांतून मी व्यक्त केलेले...
मनात माझ्या भरकटलेल्या,
आठवणींना जणू मी गुंफलेले........
माळण्यावाचून तुझ्या
हे फूल राहून गेलं ,
पण माझ्या देण्यावाचुनच
ते बिचारं सुकून गेलं .......
ओठांवरच थबकलेले शब्द कसे,
नकळतच डोळ्यांकडे वळले.
अश्रू बनून नयनातून ओघळले जसे,
न सांगताच मनातले गुपित तुला कळले................
सोबत असावी अशी कुणाची तरी,
हृदयाच्या स्पंदनातही सारखी जाणवावी,
सोडून जाण्याच्या भीतीने उर भरून आले तरी,
नयनातुन ओघळणार्या अश्रुं सोबत वाहून न जावी ......
रोजच तुझी वाट पाहताना....
एकट जगायची आता मला सवय झाली आहे,
सांजवेळी मावळणाऱ्या सूर्याने
साथ देणाऱ्या सावलीलाही सोबत नेले आहे......
आठवणींच्या या जगात कसा शोधू
मी माझ्या मनाला ,
अशी का मधेच सोडून गेलीस तू
घोर लावून या वेडया जीवाला............